सदगुरु व महाराजा मल्टीस्टेटच्या सभासदांना लाभांश वाटप!
सदगुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची यशस्वी वाटचाल!
फलटण : संस्थेच्या आर्थिक प्रगतीत सभासदांचे मोलाचे योगदान असून, सभासदांचा विश्वास आणि सहकार्य यामुळे संस्थेने प्रगतीची वाटचाल सुरू ठेवली आहे. याच पार्श्वभूमीवर संस्थेच्या वतीने श्री सद्गुरू व महाराजा उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष
दिलीपसिंह भोसले यांच्या हस्ते सभासदांना लाभांश वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. सद्गुरू पतसंस्थेची स्थापना 1989 साली झाली. आज ठेवी – 80कोटी 28 लाख,
कर्ज वाटप – 57कोटी 12लाख
नफा – 62 लाख 30हजार
वार्षिक उलाढाल – 803 कोटी आहे.
तर महाराजा मल्टीस्टेटची
स्थापना – 2010 साली झाली असून आज संस्थेकडे
ठेव – 121 कोटी 57 लाख,
कर्ज वाटप – 91कोटी 56 लाख,
वार्षिक उलाढाल – 1000 कोटी रुपये असून
नफा – 2 कोटी 35 लाख झाला आहे.संस्थेची आर्थिक स्थिती अधिक सक्षम करण्यासाठी तसेच सभासदांना उत्तम सेवा देण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात श्री सद्गुरू पतसंस्थेचे सुनील सरगर, आनंद काळोखे यांना लाभांश वाटप करण्यात आले.तर महाराजा मल्टीस्टेटचे उत्तम पवार, नागेश नागनसुरे, संपत
पिसाळ यांना लाभांश वाटप करण्यात आले.
तसेच पतसंस्थेचे सेवक रुपेश देवरे,ज्योती इंगळे, प्रसन्ना टाळकुटे, अक्षय बागल,संतोष अडागळे, शार्दुल कलमदाने यांना दिवाळीनिमित्त प्रातिनिधीक स्वरूपात बोनस वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे सीईओ संदीप जगताप यांनी आभार मानले.








